जय एकविरा

कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र किर्ती मिळवली, म्हणुन एका विर पुत्राची आई म्हणंजेच एकविरा माता होय. ‘एकवीरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी सह्याद्रिखंडता असा उल्लेख सापडतो कि शंकरानेच आईला एकविरा हे नाव देउन ठेवले आहे. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेन्दुंर चर्चीत” आहे. आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत. आईचे रुप प्रसन्नकारी आहे. एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद “जोगेश्वरी देवीची“ शेन्दुंर चर्चीत मुर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सावाच्या यात्रा होतात. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारेप्रभु, चौकळशी, पाचकळशी, क्षात्रीय, वैश्य इ. समाजाची आई एकविरा कुलस्वामीनी आहे.पुढे वाचा...

अध्यक्षांचे मनोगत

Anant Tareजगत् जननी एकवीरा आईचे देवस्थान कार्ल्याच्या डोंगरावर स्थित असल्याने एकवीरा आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही वयोगटातील भाविकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा आणि मन:शांतीकरिता आलेल्या या भाविकाला मंगलमय वातावरणात आईचे सहज-सुलभ मार्गाने दर्शन व्हावे, यासाठी सचोटीने प्रयत्न करणे हे विश्वस्त मंडळाचे आद्य कर्तव्य आहे. विश्वस्त मंडळाने आजपर्यत गडपरिसरात विविध उपक्रम भक्त व भाविकांकरीता राबविले आहेत. त्यापैकी नुकतीच गडावर २० खोल्यांचे भक्तधाम सुमारे १ कोटी रूपये खर्च करून बांधले आहेत. पुढे वाचा...