मार्गदर्शिका

राहण्याची उत्तम सोय – १) आई एकविरा विश्वस्त मंडळाची आधुनिक प्रशस्त धर्मशाळा, २) हॉटेल कैलासपर्वत, ३) कुमार रिसॉर्ट, ४) ड्युक्स, ५) कोहिनूर, ६) हॉटेल फयाद, ७) हॉटेल निताझ्, ८) खाजगी बंगले, ९) वेहेर गावात खोल्या उपलब्ध, ९) कार्लागावापसून जवळच एम.टी.डी.सी.चे लॉजींग आहे.

जेवणाची उत्तम सोय – डोगंर पायथ्याशी वेहेर गाव येथे लहानं हॉटेल आहेत. त्यात शाकाहारी व मांसाहारी उत्तम जेवण मिळते.

रस्ता मार्ग - मुंबई-पुणे महार्गावर (११०.किमी.) एक्सप्रेस हाय-वेने कार्ला फाटा लोणावळा बस डेपोतुन बस मिळते. लोणावळ्याहून रिक्षाने (१० कि.मी).

रेल्वे मार्ग – मुबंई-पुणे मार्गावर मळवली स्टेशनहून कार्ला गडावर जाण्यावर जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध.

जवळपासची पर्यटन स्थळं

१)      माहेरगाव - लोणावळ्याहून २ कि.मी. वर उजव्या हातास वाकसई लहानसे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात असून श्री एकविरा देवीचे माहेर गाव म्हणून प्रसिध्द आहे. येथे श्री कालभैरवाचे मंदीर आहे. काल भैरव आई एकविरेचा भाऊ आहे. षष्ठीस भैरवनाथाची पालखी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आईच्या दर्शनाला येणारे जुने भाविक काल भैरवाचे दर्शन आवर्जून घेतात.

२)      खंडाळा – थंड हवेचे ठिकाण

३)      बुशी डॅम

४)      लहुगड

५)      सहारा सिटी

जवळ पासचे विमानंतळ – मुंबई (११० कि.मी.) आणि पुणे