आरती एकविरा देवी देई मज वरा
शरण मी तुजलागी देई दर्शन पामरा
कार्लागडी वास तुझा भक्त सह्याद्रीच्या पायी
कर्मदृष्टीने पाहूनी सांभाळीसी लवलाही ।।१।।
चैत्राच्या शुध्द पक्षी जेव्हा उत्सव तव होई
भक्तगण मेळताती पालखी ती मिरविती ।।२।।
दर्यावरचे शुरवीर तुझ्या पायीचे आधार ।।३।।
हस्त नक्षत्राचा वारा कुठे जीवा नाही थारा
क्षण तुज आठविता त्यांसी तारीसी तु आता ।।४।।
तव पुजुनी जे राहती मनोमन स्मरूनी चित्ती
जड संकटाचे वेळी कडाडोनी प्रकट होसी ।।५।।
शांत होई तृप्त होई सेवामान्य करी आई
अभयाच्या देई वरा ठेवितो मी चरणी शीरा ।।६।।
आय माऊलीचा उदों ऊदों.... माय माऊलाचा उदों उदों.....
सदानंदाचा उजों उदों... श्री एकविरा माते की जयSSSSSSSS