माँसाहेब मिनाताई ठाकरे भक्तधाम

आई एकविरेच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण दरवर्षी कार्लागडावर येत असतात. आईच्या दर्शनाबरोबरच कार्ला गडावरील लेणी ही सुप्रसिध्द आहेत. भाविकांना गडावर वस्ती करता यावी यासाठी आई एकविरा देवस्थानच्या वतीने कार्ला गडावर माँसाहेब मीनाताई ठाकरे भक्तधाम नुकतेच बांधण्यात आले आहे. सर्व सुख-सोयींनी परिपुर्ण अशा २० खोल्या त्यात आहेत. २४ तास गरम पाणी, २४ तास वीज, जेवण करण्यासाठी ओटा, प्रशस्त हॉल, झोपण्यासाठी उत्तम बिछाना व प्रसाधन गृह इत्यादि सोयी आणि सुविधा इथे उपलब्ध आहेत. आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी भाविक दूरध्वनी वरून ०२११४-२८२३६२ या क्रमांकावर संपर्क करू शकतात.