इतिहासप्रसिध्द बौध्द लेणी

इंद्रायणी काठी नदीच्या खोऱ्यात सुमारे पाचशे फूट उंच डोंगरमाथ्यावर आई एकविरेचे स्थान आहे. त्याला लागुनच जग प्रसिध्द कार्ला लेणी आहेत.

कार्ला हे स्थान मु. वेहेर गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे आहे. कार्ला हे नाव कोरलेले या विशेषणावरून आले असावे. येथे प्राचीन बुद्धाचा विहार असल्यामुळे या ठिकाणाला विहारगाव (वेहेर) गाव असे नाव पडले. कार्ला गाव आणि वेहेर या गावाना एकच म्हटले जात असले. तरी कार्ला गाव हे एकविरा आईच्या मंदिराचे स्थान. लेण्यांचे स्थान तर विहीर (वेहेर) हे गाव कार्ला डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. कार्ला लेणी विहारातील शिल्प उशवद शकाधिपती राजाने सन १२० साली बांधले असा उल्लेख मिळतो. पण तेथील चैत्याची उभारणी नइपन्न नावाच्या शासकाने यापुर्वीच म्हणजे इ.स पूर्व ४१ व्या वर्षी केली होती असे म्हणतात.

इ.स.पू. २३० ते इ.स.पू. २३० पैठण (प्रतिष्ठान) येथे सातवाहन घराण्याच्या राजांची महाराष्ट्रावर सत्ता होती. श्रीमुख (सिमुख) सातवाहन हा राजा घराण्याचा संस्थापक होय. या घरण्याचे एकुण ३० राजे झाले. गौतमीपुत्र सातकर्णी हा त्या घराण्यातील २३ वा राजा. आईचे नाव धारण करणारा हा राजा उपासक होता. याच्या कारकिर्दीत कार्ले येथील लेणे कोरण्यास प्रारंभ झाला. इ.स.पू. ५३७ ते ४८७ या कालखंडात भगवान बुध्दाने आपले जीवन कार्य केले. कालिंग युध्दामुळे आत्मशांती शोधणाऱ्या अशोक मौर्य या भारतीय सम्राटाने बौध्द धर्माचा स्विकार केला. राजाश्रय मिळाल्यामुळे इ.स.पू. ३ ऱ्या शतकात लेणी, स्तुप विहार खोदण्यास प्रारंभ झाला असे एक मत आहे.

आई एकविरा किंवा कार्ला लेणी अभ्यासक जेव्हा जेव्हा या विषयाला हात घालतात. तेव्हा तेव्हा प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न उभा ठाकतो की मंदिर पहिले की लेणी पाहिले. संपूर्ण भारतामध्ये हजारो तीर्थ क्षेत्र आहेत पण त्यातील काही ठिकाणाचीच माहिती लेखी स्वरुपात उपलब्ध आहे. बाकी ठिकाणची माहिती ही सर्व अख्यायिका स्वरूपात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणातील माहिती मध्ये जर-तरची भाषा करावी लागते. गृहित धरावे लागते, कल्पना करावी लागते.      त्या मुळे प्रत्येक इतिहासकाराने लेखकाने आपाआपल्या परीने इतिहास लिहीला. माझ्या मताप्रमाणे आई एकविरेची मुर्ती त्या ठिकाणी त्या लहानश्या गुहेत होतीच. म्हणजे ती लेण्यांच्या अगोदर पासूनच तिथे आहेच. पण मग लेणी कोरण्यासाठी बरीच वर्ष लागली. बरच मनुष्यबळ लागलं

असेल. त्यामुळे त्या ठिकाणी तेथे बरीच माणंसाची वर्दळ असेल .मग इतक्या माणसांपैकी कोणालाच देवीचे ते स्थान दिसले नसेल का? आणि जर का दिसले असले तर मग त्यावेळी ज्याप्रमाणे आत लेण्यात स्तंभ लेखन करून त्यांचं म्हणजे तेथे त्यांनी मांडले आहे. म्हणजे प्रत्येक स्तंभावर राजाचे नाव किंवा इतर माहिती कोरली आहे. त्याचप्रमाणे एखाद्या स्तंभावर आई एकविरेबद्दलचा उल्लेख का सापडत नाही किंवा इतरत्र ही कुठेच लेखी स्वरूपातील असा उल्लेख सापडत नाही. मंदिराच्या आतून चवथऱ्यावरून पाहिल की असं नजरेस पडत की एका लहानश्या गुहेत आई एकविरेच स्थान हे लेण्यांच्या पुर्वी पासून असावं. कार्ला हे स्थान पुणे जिल्हात येतं. पुणे गँझेटीअरनुसार एकविरा देवीचे स्थान लेण्यांच्या पूर्वीपासून आहे असा स्पष्ट उल्लेख मिळतो. कै. श्री. व्य. केतकर यांच्या ज्ञानकोशात निर्देश केलाय की, एकविरा देवी मंदिराच्या प्रसिध्दीमुळे बौध्दांनी तेथे लेणे कोरले असावे. आईच्या मंदिरावर कळसाच्यावर नीट लक्ष्य देऊन पाहिलं तर लक्षात येत की एकविरा मंदिराच्या समांतर बौध्द लेण्यांच्या सुरवातीला डाव्या हातास एक सिंह स्तंभ आहे. हा स्तंभ एकसंघ पाषाणात असून त्याची उंची १३.५ मीटर आहे. हा स्तंभ षटकोनी असुन त्यास वाटोळे कंगोरेदार कळस आहे. त्यावर चौकोनी हर्मिका असून उजवीकडे बसलेले चार सिंह आहेत. महाराथी अग्निमित्रकाने हा स्तंभ खोदवून घेतला असा त्यावर शिलालेख आहे. ज्या अर्थी हा स्तंभ साडे तेरा मीटर उंच असताना दुसरा बाजुचा स्तंभ १५ मीटरचा कसा असु शकतो. कारण प्रमाण बुध्द शिल्पकलेसाठी तर कार्ला लेणी प्रसिध्द आहे असे म्हणतात. प्रत्यक्ष असलेल्या स्तंभापेक्षा कल्पनेतील तो स्तंभ उंच होता असे म्हणतात. या सांगण्यात १.५ मीटरची विसंगती आहे. अर्थात एकविरा देवीच्या मंदिराच्या जागी पुर्वी दुसरा सिंह स्तंभ होता हे खोटे वाटते. एकविरा देवीच मंदिर सिंहस्तंभाच्या समांतर व शैलगृहास लागुनच आहे हे खरे आहे.

पुराणाच्या आधारे पाहिलं तर पुराणात विष्णुने पृथ्वी तळावर १० अवतार घेतले. १) मत्स्य, २) कुर्म, ३) वराह, ४) नरसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्णा, ९ ) बुध्द, १०) काली. एकविरा आई परशुरामाची आई रेणूका परशुरामांचा विष्णु अवतार ६ वा त्यांच्या कालखंडात सह्याद्री पर्वतात दिव्य बाण मारून एकविरा देवीची स्थापना केली आणि जी बौध्द लेणी भगवान बुध्दांच्या पुण्य प्रभावातून निर्माण झालीतो बौध्द अवतार विष्णूचा आवतार ९ वा आहे. यावरून एकविरा स्थान व कार्ला बौध्द लेणी यात राम व कृष्ण या दोन विष्णु अवतारांचा फरक आहे. म्हणजेच कार्ला येथील बौध्द लेण्यांपेक्षा कार्ला येथील एकविरा मंदीर प्राचीन आहे असे काही लेखकांचे मत आहे. (संदर्भ पुस्तक- कार्लावासिनी एकवीरा आई)

कार्लाच्या लेण्यात एकूण ३६ लेख आहेत. त्यातील एका शिलालेखात जम्बु द्विपातील अव्दितीय लेणे असा लेख सापडतो. चैत्यागृह अतिशय भव्य आहे. चैत्यासमोरील सभामंडपाची लांबी १२५ फूट व रूंदी ४५ फूट आहे. (३७,८७ मी. लांब बाय १३.८७ मी. रुंदी बाय १४.०२ उंच आहे.) या मंडपावर अनेक स्तंभ असून त्यावर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. उत्कृष्ट चैत्यगवाक्ष, सरळ स्तंभ, शिल्पाक़ती व लेण्यांनसमोरील उत्तुंग सिंहस्तंभ ही या लेण्यांची वेगळी वैशिष्ये आहेत. भारतातील अनेक प्रसिध्द लेण्यांपैकी एक म्हणजे कार्ला लेणी होय, अतिशय सुंदर व नक्षीकामाचा अनोखा नजराणा येथे पाहायला मिळतो. येथील मुख्य गुंफा, सभा मंडप, शिल्पे, बौध्द शिल्पे, काष्टकाम, भित्तीचित्रे व शिलालेखासाठीही या लेण्या प्रसिध्द आहेत. कार्ला लेणीच्या प्रवेश व्दारावर उभे राहताच नजरेस अनेक प्रकारच्या मुर्त्या वरपासून ते खाल पर्यंत पहायला मिळतात. त्या अनेक देवांची व हत्ती, घोडी व इतर प्राण्यांची ही शिल्पे आहेत. लेण्यांच्या प्रवेशव्दारात तीन हत्ती उभे आहेत पणं बरीच वर्ष झाल्यामुळे सध्या दुरावस्थेत आहेत व घोडेस्वारांच्या ही मुर्त्या आहेत.  डाव्या व उजव्या बाजूच्या दोन्हीं भींतींवर, व्दारपाल, नर्तक, नक्षी, नर्तिका, वाद्यवृंद कोरलं आहेत. उजव्या हत्तीच्या ३, डाव्या हत्तीच्या तीन २ दोनेही बाजूस नक्षीदार महिरप, वर २   अशा ९ मुर्ती कोरल्या आहेत. आणि भिंतीवर अनेक स्त्रीपुरूष नर्तकांची युगुल कोरली आहेत. दर्शनी भागावरील महाव्दारावर मिथुनशिल्प काढलेले आहे. चैत्यगृहाच्या छपराच्या आतील भागावर काष्टकाम केले आहे. कार्ला लेण्यात अनेक वेगवेगळे एकुण बावीस शिलालेख आहेत. त्यातील एका लेखानुसार हे चैत्यगृह म्हणजे जम्बुव्दीपातील अव्दितीय लेणे असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे सिंहस्तभावरील लेखानुसार हा स्तंभ महारथी अग्निमित्राने दान म्हणून उभा केल्याची माहिती मिळते. तसेच नहपान क्षत्रपाचा जावई उषवदात (सुमारे १२०) व पळुमावी सात्तवाहन यांचेही येथे लेख आहेत.