देणगीदारांसाठी आवाहन 

कार्ल्याची आई एकविरा देवी ही बहुजन समाजाचे कुलदैवत मानले जाते. जगभरातील लाखो भक्तगणांची आईवर श्रध्दा आहे. आईच्या मंदिरात वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रत्येक गोष्टींची माहिती भक्तगणांपर्यंत पोहचविण्यास सुलभ व्हावे यासाठी आम्ही ‘श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट’ने हे संकेतस्थळ सुरु केलेलं आहे.

आई एकविरेच्या दर्शनासाठी कार्लागडावर प्रत्यक्षात लाखो भक्तगण दरवर्षी येत असतात. आपापली गाऱ्हाणी आईसमोर मांडत असतात, नवस बोलले जातात. अनेक भक्तांचे नवस पूर्ण झालेले आहेत, अशी प्रचिती भक्तगण सांगत असतात. ‘श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट’ दरवर्षी वेगवेगळे सण व उत्सव मंदिरात साजरे करत असते. सोबतच भक्तगणांना सुख-सोयी उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी मंदिर परिसरात अनेक प्रकारची कामे करण्यात आलेली आहेत. मंदिराच्या संपूर्ण देखभालीचे काम आमची ही ट्रस्ट करत असते, तसेच भविष्यात अनेक योजना आमच्याकडे आहेत, याची सविस्तर माहिती वेळोवेळी संकेतस्थळावरून देण्यात येईलच.

आईच्या मंदिरात दान-धर्म आणि देणग्यांच्या माध्यमातून जमा झालेला पैशाचा योग्य वापर करुन अनेक प्रकारची आणि महत्वाची कामे मंदिरात झालेली आहेत, तसेच आमच्या पुढील योजनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी आम्हाला सतत आपल्या आर्थिक सहकार्याची गरज ही लागणारच आहे. ‘श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट’ तर्फे आम्ही आपणांस मदतीसाठी जाहिर आवाहन करत आहोत.

अधिक माहितीसाठी आपण आम्हास 02114-282362 या क्रमांकावर संपर्क साधा.