कथा परशुरामाची

पित्याच्या आज्ञेने त्याने आपल्या परशुने मातेचा वध केला तसेच पित्याच्याच कृपेने मातेस जीवंत केले. पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून पुन्हा आईसाठी त्याचे ह्रदय उचंबळून आले. माता पित्याच्या उत्कट प्रेमाचा परशुराम प्रेरक ठरला. मावशीचा नवरा राजा कातिकेस ह्याने कामधेनूच्या लोभाने मुनी जगदग्नी यांचा वध केला. या आक्रमणात माता रेणूकेवर २१ वेळा वार झाले होते. कतिकेय राजासह २१ वेळा  क्षत्रियांचा नित्पात करीन अशी परशुरामाने प्रतिज्ञा केली. माझा पुत्र २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करील अशी रेणुकेची अंतिम वाणी होती युध्दासाठी तो भगवान शंकराकडे अस्त्र व शस्त्रविद्या शिकला. मातेच्या इच्छेसाठी त्याने २१ वेळा क्षत्रियांचा दारून पराभव केला. त्याच्या परशुची विरता अव्दितीय ठरली. तो महावीर म्हणून सर्वमान्य झाला.

आपले कार्य संपल्यावर भगवान परशुरामाने एक यज्ञात जिकंलेली सर्व भूमी कश्यप यांना स्नेह अर्पण केली. तो तळकोकणात (अपरांत) उतरला. २०,००० वर्षापूर्वी या देशाला समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रुंपासुन धोका आहे या जाणीवेतून सह्याद्री व समुद्र यांचा बिकट भूभागात कोकण ही मानव वसाहत बसविण्याचा त्याने संकल्प सोडला. वसई पासून रत्नागिरी पर्यंत अनेक ग्राम परशुरामांच्या प्रेरणेने वसले. संग्राम आणि तपस्या यांच्या बलावर तो विष्णुचा अवतार म्हणून गणला गेला. चिपळूणजवळ श्री परशुराम मंदीर आहे. या परशुरामाने आईच्या तीव्र आठवणीने सह्याद्रीकडे कपारीत बाण मारले. तिथे एकविरा आईची मुर्ती प्रकटली. तिच ही एकविरा माता.कोकण वसवितानां परशुरामांना रूद्र अवतारी समुद्र मागे हटवावा लागला. त्यासाठी त्यांना मंत्रभारीत दिव्य बाण मारले. (ई.स.पू.काळात कोकण किनारपट्टीची भूगोर्भिय ही भूसंसाचिक स्थितंतरामूळे बदलली. समूद्र मागे गेला, किणाऱ्यावर टेकड्या तयार झाल्या. ही नैसर्गिक स्थिती पाहणार वा जाणणारा भगवान परशुराम असावा.) तेथे बारा-बलुतेदारांनी गावे स्वयंपूर्ण बनली. शेती, व्यापार, उत्सव, परंपरा यांनी कोकण प्रसिद्ध झाले. तेथील नैसर्गिक ८४ बंदरांमुळे जग जलमार्गाने जोडले गेले. कोकणची सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक भरभराट झाली. कोकणात  राहणाऱ्या कोळी, आगरी व इतर सर्वच लोकांचा उदर निर्वाह हा पूर्णता पाण्याशी असल्यामुळे आई एकविरा जी जलदेवता असल्यामुळे ती कोकणवासीयांची व कोळी, आगरी, कुणबी, माळी, सोनार, पाठारेप्रभु, चांद्रसेनिय कायस्थ प्रभु, वैश्य, चौकळशी-पाचकळशी प्रभु या समाजाची कुलदैवत झाली. या सर्व समाजातील लोकांना वेळोवेळी आई प्रचिती येते. पौराणिक कथांपासून तर लेखी स्वरूपात आढळलेल्या माहीतीआधारे आई एकविरा ही स्वयंभु असून तीची लीला पूर्वी पासून ते आजपर्यंत सर्वांनीच अनुभवली आहे.

पौराणिक कथेत परशुरामाने सह्याद्रिच्या कडे-कपारीत दिव्य बाण मारून तिथे आई एकविरेची मुर्ती प्रगट केली. तेव्हापासून कार्ला गडाच्या आश्रयाला खूप लोक येउन गेले. कारण सह्याद्रिच्या कुशीत असलेला कार्ला गड हा पुर्णता सुरक्षित आहे. (देवीचे स्वयंभू स्थान हे निहांसाच्या म्हणजे लेण्यांच्याहीपूर्वी पासूनच असावे कदचित आई एकविरेच्या त्या भागातील प्रसिध्दी मुळेच येथे बौध्द लेणी कोरली असावी असा स्पष्ट निर्देश पुना गॉझेटिअर आणि कै. श्री. केतकर यांच्या ज्ञानकोशात मिळतो.)