आई एकविरा घडामोडी

जगप्रसिध्द कार्ला-लोणावळा गडावरील आई एकविरा देवीचा नवरात्रो उत्सव सोहळा

15/10/2012

कार्ला लोणावळा गडावरील सुप्रसिध्द आई एकविरा देवीच्या देवस्थानाचा पंपरेनुसार या वर्षीही नवरात्रोत्सव आनंदात, उत्साहात संपन्न होणार आहे. घटस्थापना अश्विन शुध्द प्रतिपदा मंगळवार दि.१६ ऑक्टोंर,२०१२ ते दसरा बुधवार २४ ऑक्टोंबर २०१२ पर्यंत होणार आहे. तसेच अश्विन शुध्द महानवमी मंगळवार दि.२३ ऑक्टोंबर,२०१२ रोजी पहाटे देवीच्या अभिषेकानंतर देवीची विषेश आरती झाल्यानंतर पहाटे ५.०० वाजता महानवमी होमाचा कार्याक्रम संपन्न होणार आहे. कार्ला गडावर सालाबादा प्रमाणे यावर्षीही नवूरातिरीचा सोहळा विषेश थाटात धार्मीक वातावरणात साजर होणार असून, आईच्या मंदिरात नव दिवस पारंपारीक पध्दतीने चालत आलेल्या आईच्या सर्व विधि, पारायण, भजन, किर्तन, व आरतीचे आयोजंन केले आहे. विश्र्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यावस्था, वीजेची व्यावस्था, पार्किंगची व्यावस्था, सुलभतेने दर्शनघेता यावे यासाठी रेलिंगची व्यावस्था,व अन्य सोई-सुविधांची चोख व्यावस्था सदर कालावधीमध्ये ठेवण्यात आली आहे, ठाणे येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसाईक सोहम बिल्डर्स ह्या कंपनीने दिलेल्या पोटा कँबीन (घोटे) मध्ये भाविकांसाठी माहिती आणि मदत केंद्राचे उद्घाटन तसेच मा. आमदार सौ.निलमताई गोऱ्हे आणि मा. खासदार श्री. गजानन बाबर ह्यांनी दिलेल्या निधीतून पार्कींगमध्ये बसविलेल्या पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन होणार आहे. सदर पेव्हर ब्लॉकमुळे पार्किंग येथे होणार चिख्खला तसेच धुळीचा त्रास आता भाविकांना होणार नाही. तसेच पार्कींग येथे तयार केलेल्या संस्थानच्या कार्यालयामुळे भाविकांना होणार नाही. तसेच पार्किंग येथे तयार केलेल्या संस्थानाच्या कार्यालयामुळे भाविकांना माहीती व मदत मिळण्यास फार मोठी सोय होणार आहे. सदर वनरात्रोत्सव आनंदात आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी श्री एकविरा देवस्थान कार्ला लोणावळा संस्थानच्या विश्र्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.अनंत तरे, उपाध्यक्ष – श्री. मदन भोई, सेक्रेटरी – संजय गोविलकर, खजिनदार – श्री नवनाथ देशमुख, विश्र्वस्त सल्लागार – श्री गणपत पडवळ, कळूराम देशमुख, आणि मंदिर व्यावस्थापनपरिश्रम घेत आहेत. सदर नवरात्रोत्सवास एकविरा भाविकांनी मोठ्या संख्येने यावे असे आमंत्रण संस्थानचे अध्यक्ष श्री.अनंत तरे यांनी केलेले आहे..