आई एकविरा घडामोडी

एकविरा देवस्थानच्या विकासकामे माहितीपटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

23-03-2018

कार्ला-लोणावळा येथील नवसाला पावणारी आई एकवीरा देवींच्या गडावर गेल्या २५ वर्षात भाविकांकरिता एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली. या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या माहितीपटाचे प्रकाशन नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे करण्यात आले. भाविकांना सुलभतेने, सहजतेने दर्शन व्हावे याकरिता गडावर खासदार निधी व अनंत तरे यांच्या आमदार निधीतून गडावर विकासाची गंगा वाहत आहे. याचा आढावा या माहितीपटात घेण्यात आला आहे. विकास पटाच्या ध्वनीफितीचे काम मयुरेश कोटकर यांनी केले आहे. यावेळी २४ मार्चला होणाऱ्या एकवीरा देवीच्या चैत्री पालखी सोहळ्याचे निमंत्रणदेखील उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी एकवीरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, सह खजिनदार विलास कुटे उपस्थित होते. .